राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
तुषार पाचलकर / राजापूर
दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सद्या लांजा राजापूर तालुक्यात यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. फसवणुकीच्या तक्रारीही राजापूर पोलीस ठाण्यात वाढल्या आहेत. फेक कॉल्स मुळे येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. अनेक तक्रारी पोलीसांकडे येतं आहेत. राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी याबाबत एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे
या कॉलमध्ये तुमच्या मोबाईल वर आलेला OTP मागितला जातो. pdf फाईल पाठवली आहे ती ओपन करा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, तुमचा अकाउंट नंबर द्या, अशा प्रकारचे कॉल सध्या अनेक नागरिकांना येतं आहे. अशा भूलथापांना बळी पडू नये असे त्यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, नागरिकांनी अशा कॉल पासून सावध राहावे व आपल्या बँक अकाउंटची डिटेल्स कोणालाही देऊ नये असं आवाहन केलं आहे.