गुहागर : घरकाम संपवून घरी परतणाऱ्या महिलेची छेडछाड करणाऱ्या आंबट शौकीन संशयिताच्या गुहागर पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मुसक्या आवळल्या. गुहागर पोलिसांच्या या कामगिरीमुळे महिला वर्गाला दिलासा मिळाला आहे. सदर घटना गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर मार्गावरील शिगवण सडा या ठिकाणी घडली.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कौंढर काळसूर रोडवरील शिगवणसडा या ठिकाणी शृंगारी येथून धुणी भांडी व घरकाम करून कौंढर रस्त्याच्या मार्गे आपल्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या एका इसमाने स्कुटीवरून येत महिलेच्या शेजारी गाडी उभी केली. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पलायन केले होते. ही घटना 4 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेने तात्काळ गुहागर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद केल्यामुळे अवघ्या सहा तासाच्या अथक प्रयत्नाने संशयित आरोपीला अटक केली आहे. संकेत सदानंद जाधव (३१, रा. नरवण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका
गुहागर पोलीस शहर बाजारपेठेबरोबर गुहागर शहरातही अनेक व्यावसायिक यांना आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात सांगत आहेत. शृंगारतळीमध्येही असेच सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे अनेक आणि बसवले आहेत. यामुळे याच सीसीटीव्हीच्या फुटेच्या मदतीने गुहागर पोलिसांनी संशयित आरोपीला गुहागरातून अटक केली आहे. फिर्यादी यांनी गुहागर पोलीस स्टेशन येथे त्वरित गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. पोलिसांनी भा.द.वि. कलम ७४, ७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी संकेतला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल श्री नलावडे करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे, पोलीस हवालदार वैभव चोगले, श्री घोसाळकर, प्रितेश रहाटे, प्रथमेश कदम यांनी कामगिरी केली