संगमेश्वर : आंबा घाटातील कळकदरा पुढील भागात चौपदरीकरण काम सुरु असताना ब्लास्टिंग करताना दगड, माती आली रस्त्यावर आल्याने शुक्रवारी मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.मार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
आंबा घाटात मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.बास्टिंग देखील केले जात आहे. शुक्रवारी काम सुरू असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दगड व माती मार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ठेकेदार कंपनीकडून मशीनने माती बाजूला करण्याची मोहीम हातीं घेण्यात आली. एक तासात वाहतूक सुरळीत झाली. काम सुरू असताना दुर्दैवी घटना घडल्यास कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित होत आहे.ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे.
हायवे विभागाने ठेकेदार कंपनीवर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे बोल वाहन चालकांमधून उमटत आहेत.