रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज व शहरातील साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेल्या संशयितांवर पोलिसांनी कारवाई केल़ी. 4 डिसेंबर रोजी पोलिसांकडून साळवी स्टॉप व नाणीज येथे छापा टाकण्यात आला होत़ा. यवेळी संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्य़ा. नाणीज येथे एका तर साळवी स्टॉप येथे चौघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा.
विलास दिलीप गुरव (35, ऱा नाणीज रत्नागिरी), फिरोज रज्जाक सिंदगीरा (ऱा परटवणे रत्नागिरी), शादाब गियास खले (ऱा पडवे गुहागर रत्नागिरी), मस्तान महम्मंद हुसेन शेख (26, ऱा क्रांतीनगर रत्नागिरी) व अयुब गुलाब शेख (25, ऱा क्रांतीनगर रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़. विलास गुरव हा नाणीज जुना मठ येथे रस्त्याकडेला तर फिरोज सिंदगीरा, शादाब खले, मस्तान शेख, अयुब शेख हे संशयित साळवी स्टॉप येथे आडोशाला दारु पित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. पोलिसांनी पाचही संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल केल़ा.