संगमेश्वर : शास्त्री नदीच्या पात्रालगत कातळी या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून दुखापत झाल्याने अव्यज शौकत हुसेन मोडक वय 62 वर्षे राहणार नायरी मोहल्ला या प्रौढाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अव्यज शौकत हुसेन मोडक हे शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 च्या पूर्वी मौजे कळंबस्ते शास्त्री नदीच्या लगत प्रांतविधी करता गेले असता तेथून परत येत असताना पाखाडीवरून तोल जाऊन तीन फूट खोड खड्ड्यांमध्ये पडून त्यांच्या डोक्याला लहान मोठी दुखापत होऊन पडले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत रईस अब्दुल रहमान अलजी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर करत आहेत.