गुहागर : चिपळूण मार्गे गुहागर मध्ये जाताना मुंबईतील पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला अपघात झाल्याने 17 प्रवासी जखमी तर 6 गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली.
मुंबई डोंबिवली येथून पर्यटकांना घेऊन चिपळूण मार्गे गुहागरच्या दिशेने ही टेम्पो ट्रॅव्हल्स जात असताना टायर फुटल्याने रस्त्याच्या मध्ये पलटी झाली. या अपघातामध्ये महिलेसह एका पुरुषाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच 17 जखमींना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनास्थळी सध्या रामपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमीना मदत करण्यात आली.