पाली : जीवनासाठी माती अत्यावश्यक आहे. कारण, ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यांसह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्रोत असून, मातीचे संवर्धन आवश्यक आहे. याशिवाय माती वेगवेगळ्या प्रमाणात खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनलेली असते. जीवनासाठी ते महत्त्वाचे आहे. कारण, ते वनस्पतींच्या वाढीसाठी ऐक माध्यम आहे. अनेक कीटक आणि ईतर जिवाचे घर आहे असे प्रतिपादन रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले.
रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे हातखंबा येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना हेगडे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे मातीची झाली. धूप कमी करण्यासाठी सुपीक माती आणि संसाधन म्हणून मातीचा शाश्वत वापर याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी अन्न आणि कृषी संस्थेद्वारे दरवर्षी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. जशी पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे त्याचप्रमाणे मातीचेही महत्व आहे. भारतातील अध्यपिक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे; परंतु शेतकऱ्यांकडून शेतात अत्याधिक प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केल्याने मातीचा दर्जा घसरत आहे. मातीचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. अन्नसुरक्षा, वनस्पतींची वाढ, जीवन आणि कीटक तसेच प्राणी आणि ‘मानवजातीच्या अधिवासासाठी मातीचा ऱ्हास एक मोठा धोका आहे. भारतात सुमारे ४५ वर्षांपूर्वी ‘माती वाचवा चळवळ’ सुरू झाली आहे.
तंत्र अधिकारी नित्यानंद भोसले यांनी मृदादिनाचे औचित्य साधून माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले.यावेळी कृषी अधिकारी हर्षला पाटील, कृषी पर्यवेक्षक रघुनाथ डवरी, राहुल पाटील, तंत्र अधिकारी आमिर डांगे, कृषी सहाय्यक सागर सांगवे, नवजीवन सेंद्रिय शेती गट अध्यक्ष श्रीमती बोंबले,महिला सदस्य, शेतकरी उपस्थित होते.