रत्नागिरी : योग नगरी ऋषिकेश एक्स्प्रेसने प्रवास करताना भोके रेल्वे स्थानकावर महिलेची हॅण्डबॅग घेउन चोरटा फरार झाला. या बॅगेत रोख रक्कम व कागदपत्रे होती. ही घटना २८ सप्टेंबर रोजी पहाटे ६.१५ वा. घडली होती. याबाबतची फिर्याद महिलेने ४ डिसेंबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.