लांजा : सापुचेतळे रोडवर दोन आंबा येथे रस्त्याच्या मधोमध इतर वाहनास अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे ट्रक लावल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमु रामू शेटेनावर (३०, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद लांजा महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक यांनी दिली. हा प्रकार ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.