6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6 षटकार
मुंबई : देशांतर्गत सैयद मुश्ताक अली टी20 क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील दिग्गज खेळाडू खेळत आहे. त्यामुळे विक्रमांचा वर्षाव होत आहे. मेघालय विरुद्ध पंजाब सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. या स्पर्धेतलं दुसरं वेगवान शतक ठोकलं.
सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत मेघालय आणि पंजाब हे संघ आमनेसामने आले होते. मेघालयने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि 20 षटकात 7 गडी गमवून 142 धावा केल्या आणि विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाबने अवघ्या 9.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यावेळी अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. मेघालयविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या अभिषेकने गोलंदाजांची धुलाई केली. अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकलं. तसेच उर्विल पटेलच्या वेगवान शतकाची बरोबरी केली.
गुजरातच्या उर्विल पटेलने त्रिपुराविरुद्ध सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. अवघ्या 28 चेंडूत शतकी खेळी केली होती. या खेळीद्वारे टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला होता.
अभिषेक शर्माने 29 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यात 11 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 365.52 इतका होता. अभिषेक सर्वात जलद शतक झळकावणारी भारतीय फलंदाज बनला आहे.सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा जगातील तिसरा फलंदाज होण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे.
या यादीत साहिल चौहान पहिल्या क्रमांकावर आहे. 2024 मध्ये एस्टोनियाकडून खेळलेल्या साहिलने सायप्रसविरुद्धच्या टी20 सामन्यात फक्त 27 चेंडूत विश्वविक्रमी शतक ठोकलं आहे.
उर्विल पटेलने गुजरातकडून खेळताना 27 चेंडूत शतक झळकावून या विश्वविक्रमी यादीत दुसरा क्रमांक पटकावला. आता अभिषेक शर्माने 28 चेंडूत शतक झळकावले असून तो या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.