पुरुषाचा हात तर महिलेचे दोन्ही पाय निकामी
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरी विन्हेरे फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर उलटून ५ जण जखमी झाल्याची घटना ३ जानेवारी २०२४ रोजी घडली होती. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातून उपचार घेउन आल्यानंतर नितीन त्रिभुवनदास रायचुरा (५७, अमरावती) यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार ट्रॅव्हलर चालक शैलेश संपत बिरामणे (कोपरखैरणे, नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश हा आपल्या ताब्यातील ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी६९०१) मधून प्रवासी घेउन मुंबई गोवा महामार्गाने चालला होता. यावेळी खेड नजीकच्या विन्हेरे फाटा येथे भरधाव वाहनावर त्याचा ताबा सुटला. ट्रॅव्हलरचे चाक डिव्हायडरला घासून टायर फुटून गाडी विरुध्द दिशेला जावून सिमेंटच्या कठड्यावर आदळ- ली. या अपघातात फिर्यादी नितीन रायचुरा यांच्या उजव्या हाताला व पायाला फॅक्चर झाले होते. तसेच त्यांची पत्नी संगीता, ओमप्रकाश डोंगाणे यांच्या उजव्या पायाला फॅक्चर झाले. तसेच चेतना जितेंद्र ठाकूर यांचे दोन्ही पाय कंबरेतून निकामी झाले होते. तसेच सतीश सकसुळे यांचा उजवा हात निकामी झाला होता. या अपघातातून सावरल्यानं- तर नितीन गयचुरा यांनी खेड पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर रोजी टेम्पो ट्रॅव्हलर चालक शैलेश बिरामणे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर भादविकलम २७९, ३३७. ३३८ नुसार गुन्हा दाखल केला.