रत्नागिरी : कपडे वाळत घालताना घसरुन पडल्याने उपचारादरम्यान वृध्देचा पुणे येथो मृत्यू झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्ल्या माहितीनुसार, नुरजहाँ नुरुद्दीन वस्ता (५३, राजीवडा नाका, रत्नागिरी) या घरात कपडे वाळत घालत असताना १६ नोव्हेंबर रोजी पाय घसरून पडल्या. त्यांच्या हाताला फॅक्चर झाले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल केले असता २३ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ससून रुग्णालय पुणे येथील डॉक्टरांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.