रत्नागिरी : बोटीतील लोखंडी कप्पा तुटून उडून पायाच्या पोटरीवर आदळ न गंभीर जखमी झालेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल संतोष वना तुंबडा (२६, पालघर, सध्या राजीवडा) असे मृत्य झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना१६ नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालय मुंबई येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष तुंबडा हा राजीवडा येथे बोटीवर कामाला होता. २६ नोव्हेंबर रोजी मिरकरवाडा येथे समृध्दी २ या बोटीतून मासेमारीकरीता जाताना बोटीतील लोखंडी कप्पा तुटून उडून त्याच्या डाव्या पोटरीवर जोरदार बसला. यावेळी त्याच्या पायातून बळाबळा रक्त वाहू लागले, रक्तस्राव थांबत नसल्यानने बोटीवरील खलाशांनी त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी श्रीवर्धन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून रक्ताच्या बॉटल चढवण्यात आल्या. तरीही रक्त थांबत नसल्याने त्याला केईएम रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर ४ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली.