मुंबई:-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिला मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
नागपूर-गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यामुळे निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता नव निर्वाचीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यात समर्थन आहे. येथील शेतकरी भूसंपादन करा असे सांगत आहेत मात्र, कोल्हापूर जिल्हा जेथे सुरु होतो तेथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. यामुळे आता जिथे समर्थन आहे त्या भागात शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
विरोध पत्करुन आम्ही समृद्धी महामार्ग केला नाही. सर्वांच्या परवानगीनेत शक्तीपीठ महामार्गाचे काम होईल. शेतकऱ्यांना नाराज करुन, शतेकऱ्यांच्या जमीनी जबरदस्ती घेऊन विकास करण्याची मानसिकता आमची नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शक्ती पीठ महामार्गात अडथळे असतील तर पर्याय शोधले जातील. विरोध असलेल्या भागात फ्लायओव्हर किंवा सध्या असलेल्या माहामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडता येईल अनुषंगाने बदल केले जातील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडा विशेषत: संभाजी नगर आणि जालना जिल्ह्याचा विकास होणार आहे. त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येईल. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.