खेड : जिल्हा रहिवासी मंडळ, सर जे.जे. रुग्णालय, मुंबई यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जाखडी नृत्याची जुगलबंदी रंगणार आहे.
राजापूर तालुक्यातील तुरेवाले शाहीर अमोल दैत्य आणि खेड तालुक्यातील शक्तिवाले शाहीर सचिन कदम यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा रहिवासी मंडळाचे अध्यक्ष अशोक मुल्की, उपाध्यक्ष महेश चव्हाण, संतोष म्हाफोळकर, सरचिटणीस सचिन मयेकर, सहसचिव सागर कुडवे, सुशांत जाधव, खजिनदार राजेश पवार, सहखजिनदार प्रसाद जेधे, प्रमुख सल्लागार सुरेश कुड़वे योगेश पवार, आदेश पवार, दिनेश पवार मेहनत घेत आहेत.