रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे पाचकुडेवाडी येथे मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील बाळू पाचकुडे (24, ऱा मावळती पाचकुडेवाडी करबुडे, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर सोमवारी स्वप्नील याच्यासह चौघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्वप्नील याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संतोष शंकर पाचकुडे, रमेश शांताराम पाचकुडे, अशोक गणपत पाचकुडे व एकनाथ सुरेश पाचकुडे (ऱा सर्व करबुडे पाचकुडेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्ह्यातील माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी सायं. 4 च्या सुमारास आरोपी यांच्या घरी दिवाळीचे विडे मांडण्याचा कार्यक्रम सुरु होता. येथे स्वप्नील हा गेला असता आरोपींनी त्याला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले. यावेळी तक्रारदार व आरोपी यांच्यात वाद झाल्याने आरोपींनी बॅटने स्वप्नील याला मारहाण केली, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली, त्यानुसार पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कायदा कलम 118(2),115(2),131, 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा तसेच चौघा संशयितांना बुधवारी पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे हजर केले.