संगमेश्वर:-कोंबडी, कुत्र्यांच्या शिकारीच्या शोधात बिबटयाने घराच्या अंगणात प्रवेश केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बामणोली मधलीवाडी येथे सोमवारी रात्री घडली. भक्ष न मिळाल्याने त्याला रिकामे परतावे लागले. बिबटया आत येण्याची एन्ट्री व पुन्हा बाहेर जाणे, ही सर्व हालचाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू अहे. भरदिवसा बिबटया जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असताना बामणोली मधलीवाडी येथील संतोष घोलम यांच्या अंगणात बिबटयाने सोमवारी रात्री रात्री 9 वा व पुन्हा 1.30 वा. एन्ट्री केली. त्याची हालचाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटया थेट अंगणात पोहोचला आहे. या घटनेमुळे बामणोलीवासिय भयभीत झाले आहेत.