राजापूर आगाराकडून सकाळची बस बंद केल्याने ‘ग्रामीण वार्ता’ने केली पोलखोल
विद्यार्थी, पालकांनी मानले ‘ग्रामीण वार्ता’चे मानले आभार
राजन लाड / जैतापूर:-राजापूर आगारातून पहाटे 5 वाजता सुटणारी आंबोळगड रत्नागिरी बस बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थांचे हाल झाले होते. याबाबतचे वृत्त ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाने प्रसिद्ध केले होते. राजापूर आगाराच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल संताप व्यक्त केला होता. हे वृत्त राजापुरात पसरताच नागरिकांनी आगारात धडक दिली. तसेच राजापूरचे नूतन आमदार किरण सामंत यांना कळताच त्यांनी आगाराला याबाबत जाब विचारला. यावर आगाराने उद्यापासून ही बस नियमित सुरू होईल असे आश्वासन दिले. यामुळे राजापूर आगारातून सुटणारी आंबोळगड रत्नागिरी बस उद्यापासून सुरू होणार आहे.
या वृत्ताची दखल आगाराने घेतल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ग्रामीण वार्ताने आभार मानले. ग्रामीण वार्ता ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. तर ग्रामीण वार्ताच्या प्रतिनिधींनी राजापूरचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यांनी देखील तात्काळ या वृत्ताची दखल घेत एसटीच्या फेऱ्या नियमित करण्याविषयी सूचना केल्याचे वृत्त आहे.
आंबोळगड रत्नागिरी सकाळी पाच वाजता सुटणारी गाडी दोन दिवस अचानक रद्द केल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे मनस्ताप सहन करावा लागल्याचे वृत्त ग्रामीण वार्ता मधून प्रसिद्ध झाले होते. यानंतर आज दुपारी आडिवरे नवेदर कशेळी भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांनी राजापूर आगारात जात अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या गाडीने प्रवास करणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि पालकांनी ग्रामीण वार्ताच्या प्रतिनिधींना संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्याबद्दल ग्रामीण वार्ताचे आभार मानले आहेत.