संगमेश्वर : घरात रेटॉल नावाचे विषारी औषध प्राशन केलेल्या ५५ वर्षीय प्रौढाचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद तुकाराम पोवार (रा. उक्षी-गराटेवाडी, रत्नागिरी, सध्या रा. मुचरी-भाताडेवाडी, संगमेश्वर) असे मृताचे नाव आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती.
गोविंद पोवार हे मुचरी-भाताडेवाडी येथील शालिनी शांताराम भाताडे यांच्याकडे राहत होते. ४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अज्ञात कारणातून रेटॉल नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यांत आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.