गावखडी / वार्ताहर
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील ग्रामदेवता श्री. जाकादेवीच्या मंदिरात देवदिवाळी निमित्त एक दिवसीय जत्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. या देवदिवाळी उत्सवानिमित्त मंदिरात श्री जाकादेवी, जुगादेवी, मानूबाय या देवींना मुखवटे लावले जातात. देवीची पूजा, आरती सर्व भक्तगणां च्या उपस्थितीत करण्यात आली. गावखडीतील श्री जाकादेवी नवसाला पावणारी , संकटसमयी हाकेला धावणारी जागृत देवी असल्यानेच आज देवदिवाळी निमित्त एक दिवसीय जत्रेत हजारो भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. देवीची ओटी भरण्यासाठीच सुवासिनी महिला मुंबई, पुणे ,रत्नागिरी येथून आल्या आहेत.