रत्नागिरी: डेरवण येथील एस.व्ही.जे.सी.टी. येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रत्नागिरीतील ल.ग.पटवर्धनमधील इयत्ता पहिलीतील मानस मोरे याने ७२० पैकी ५५७ गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मानस मोरे हा सर्वात लहान खेळाडू होता. लहान असूनही त्यांने अचूक नेम साधत यश संपादन केले आहे.
डेरवण येथे १० व १३वर्षे वयोगटातील राज्य धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली सन २०२४‚२५ च्या अनुषंगाने या वयोगटातील जिल्हास्तरीय धनुा|वद्या स्पर्धेचे आयोजन एस.व्ही.जे.सी.टी. डेरवण येथे दि. १ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले.
धनुर्विद्या स्पर्धा कंपाऊंड, रिकर्व व इंडियन या ३ प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत झोरेज् स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू मानस संजिवनी साईप्रसाद मोरे (वय वर्षे ६) हा १० वर्षे वयोगटातील इंडियन या प्रकारात ७२० पैकी ५५७ गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये हा सर्वात लहान खेळाडू ठरला. मानसला झोरेज् स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच मार्तंड संजय झोरे यांचं मार्गदर्शन लाभत आहे. मानस ल.ग.पटवर्धन मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे.
स्पर्धेतील मानस मोरे हा सर्वात लहान खेळाडू होता. मात्र त्यांने सुरुवातीपासूनच अचूक नेम धरला होता. तीनही प्रकारात त्याने अचून नेम साधल्यामुळे त्याला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तर उपस्थित शिक्षक, पालकांनी मानस मोरे यांचे कौतूक केले आहे.