लांजा : लांजा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे.
लांजा हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारे रवींद्र वासुरकर यांनी क्रीडा क्षेत्रात लांजा हायस्कूलला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. क्रीडा शिक्षक म्हणून काम करण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही देखील त्यांचा सहभाग असतो. विशेषतः कोरोना काळात त्यांनी स्वखर्चाने कोरोना योद्धांना चहा नाष्टा पुरवण्याचे काम निरपेक्ष भावनेने केले होते.
क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने त्यांना हा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल शिक्षक रवींद्र वासुरकर यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.