नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे.
मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची फोन करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक विरोधक वाढले आहेत. ज्याने हा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे. फोन कुठून आला सत्यता पडताळण्यात येत आहे. लवकरच धमकी देणाऱ्याला अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.