रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा पराभव केला. या निवडणूक रिंगणात एकूण आठ उमेदवार होते. एक आणि दोन क्रमांकाची मते मिळवलेले हे दोन उमेदवार वगळता उर्वरित सहाही उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली आहे. सहा उमेदवारांची प्रत्येकी २५ हजारप्रमाणे दीड लाखांची रक्कम शासनदरबारी जमा झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी याला दुजोरा दिला.
रत्नागिरी विधानसभा निवडणूक रिंगणात उदय सामंत, बाळ माने यांच्यासह एकूण ९ उमेदवार होते. निवडणुकीत उदय सामंत यांना १ लाख ११ हजार ३५३ मते मिळाली तर बाळ माने यांना ६९ हजार ७४५ मते मिळाली. ४१ हजार ६०७ मतांनी सामंत विजयी झाले तर ३ हजार ७२ मतदारांनी नोट पर्याय निवडत नकारात्मक मतदान केले.
नियमानुसार भारत पवार, कैस फणसोपकर, कोमल तोडणकर, ज्योतीप्रभा पाटील, दिलीप यादव पंकज तोडणकर या सहा उमेदवारांचे डीपोझिट या निवडणुकीत जप्त झाले आहे.