रत्नागिरी:-रत्नागिरी येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा मृतदेह आढळून आला होता. मृताचे वय अंदाजे 70 असून उंची 5 फुट 5 इंच, रंग सावळा, डोक्यावर मागे टक्कल, अंगावर जांभळ्या रंगाचा हाफ टीशर्ट, कमरेला निळ्या रंगाचा बरमोडा परिधान केलेला आहे. हा मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आला आहे. मृताबद्दल कुणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.