रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील उदय सामंत सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. बाळ मानेंचा ४१ हजार ५९० मतांनी पराभव करत त्यांनी आता 25 वर्षे रत्नागिरीच्या राजकारणात एकहाती सत्ता ठेवणारे एकमेव आमदार ठरले आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत १ लाख ११ हजार ३३५ इतकी मते मिळाली आहे. त्यांनी मविआचे उमेदवार बाळ माने यांचा ४१ हजार ५९० मतांनी दणदणीत पराभव केला. बाळ माने यांना ६९ हजार ७४५ मते मिळाली. ३ हजार ७३ मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली आहे. उदय सामंत विजयी होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.