रत्नागिरी:-येथील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये येत्या २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावर विशेष तपासणी करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रेटिना विभाग आहे.
तेथे हॉस्पिटलचे रेटिनातज्ञ डॉ. प्रसाद कामत अतिशय अवघड व गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटल सुरू झाल्यापासून करीत आहेत. आता डॉ. कामत या महिनाअखेरीस रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. इन्फिगोच्या रेटिना विभाग B- Scan, Green Lazer, 3D OCT व अत्याधुनिक अर्टली VITRECTOMY मशीन अशा यंत्रांनी सुसज्ज आहे. सतत चष्माचा नंबर बदलणे, अचानक नजर कमी होणे, पडदा सरकणे किंवा पडद्याला सूज येणे, डायबेटिसमुळे दृष्टी कमी होणे, ४० वर्षांपेक्षा अधिक वय असल्यास, डोळ्यातील प्रेशर वाढणे, डोळ्यापुढे काळे ठिपके दिसणे, मायनस ३ पेक्षा अधिक नंबरच चष्मा असल्यास अशा रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. मुख्यतः डायबेटिस असणाऱ्यांनी अवश्य तपासणी करून घ्यावी. डायबेटिसमुळे डोळ्यांच्या पडद्यावर दुष्परिणाम होत असतात व ते कायमस्वरूपी असतात. या रेटिना तपासणीसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. तपासणीसाठी थोडा वेळ लागत असल्याने सोबत एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. रत्नागिरी, लांजा, देवरूख, संगमेश्वर, राजापूर येथील नागरिकांनी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटलने केले आहे.