खेड : गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या प्रौढाला खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी सायंकाळी तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे करण्यात आली. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निहार हेमंत वारणकर (३६), असे गुन्हा दाखल केलेल्या प्रौढाचे नाव आहे. त्याच्याकडून ७,५०० रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री जप्त करण्यात आली. लोटे एमआयडीसी येथे एका घराच्या पाठीमागे दारूचा साठा घेऊन असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार प्रवीण खांबे यांनी खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.