चिपळूण : रेल्वेस्थानकासमोर सुशोभिकरणाच्या बाजूला एक 55 वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेतून त्यास कामथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.