विरार:- मतदानासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. अशा वेळी भाजपचे राष्ट्रीय सरचीटणिस विनोद तावडे यांना पाच कोटीचे वाटप करताना पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्येच घेरलं होतं. त्यांना बाहेर पडू दिलं नाही. हळूहळू वातावरण तापत गेलं. काही वेळा हितेंद्र ठाकूरही तिथे पोहोचले. कार्यकर्त्यांना तावडेंवरही यावेळी पैसे उधळले. पोलिस आणि निवडणूक आयोगाची लोकं ही घटनास्थळी पोहोचले. तब्बल साडे तीन तास हा सर्व ड्रामा सुरू होता. शेवटी विनोद तावडेंनी कशीबशी तिथून सुटका करून घेतली. सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेला हा प्रकार साडे तीन वाजेपर्यंत सुरू होता. त्यावेळी काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात.
सकाळी 11.30 वाजता :- भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर स्थानिक नेते आणि पदाधिकारी होते.
सकाळी 11.45 वाजता :- हॉटेल विवांतामध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजली. ही माहिती आमदार क्षितीज ठाकूर यांना ही समजली.
दुपारी 12.00 वाजता :- पैसे वाटप होत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी हॉटेलवर धडक दिली.
दुपारी 12.30 वाजता :- बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये तावडेंना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी तावडे यांना जाब विचारला. त्यामुळे एकच गोंधळ हॉटेलमध्ये झाला.
दुपारी 12.40 वाजता:- गोंधळ सुरू असतानाच बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर देखील तिथे दाखल झाले. त्यानंतर आणखी गोंधळात वाढ झाली.
दुपारी 12.50 वाजता:- यावेळी विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना कार्यकर्त्यांनी घेरले होते. त्यांना बाहेर जाण्यापासून अटकाव केला जात होता.
दुपारी 1.00 वाजता :- या वेळी एका कार्यकर्त्याने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेतली. ती तपासली असता त्यातून पैसे भरलेले लिफाफे सापडले. ही लिफाफे खोलले असता त्यात पैसे आढळून आले.
दुपारी 1.20 वाजता :- कार्यकर्त्यांनी आणखी शोधाशोध केली. त्यावेळी बॅगेतून एक लॅपटॉप आणि डायऱ्या देखील सापडल्या.
दुपारी 1.30 वाजता :- या सर्व गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या. शिवाय विनोद तावडे यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी आमदार क्षितीज ठाकूर यांनी केली.
दुपारी 1.40 वाजता :- या घटनेची माहिती स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना मिळाले. त्यांनीही थेट हॉटेल गाठवं. त्यानंतर भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांत तुफान राडा झाला.
दुपारी 2.00 वाजता :- हॉटेलवर जोरदार राडा सुरू असताना त्याच वेळी बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूरही दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाले होते.
दुपारी 2.20 वाजता :- विरारमधील एका हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटणार असल्याची माहिती हितेंद्र ठाकुरांना कालच एका भाजप नेत्याकडून मिळाली होती. अस हितेंद्र ठाकूर म्हणाले.
दुपारी 2.30 वाजता :- विनोद तावडे यांनी आपल्याला एकूण 25 फोन केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. शिवाय मला माफ करा, मला जाऊ द्या असंही ते म्हणाल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
दुपारी 3.00 वाजता :- विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. असं असताना पैसे वाटत होते हे लाज आणणारे आहे. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.
दुपारी 3.15 वाजता :- या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत केले. पण ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली.
दुपारी 3.30 वाजता :- या संपुर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला. अशी माहिती पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी दिली. शिवाय पत्रकार परिषद घेणे आचारसंहीतेचा भंग होता त्या विरोधातही गुन्हा दाखल करणार असल्याचं त्या म्हणाल्या.