विरार : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी केला.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या कडूनहा प्रकार होत असल्याचे गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना वसई-विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला आहे.
दरम्यान, याच प्रकरणावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. अशातचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची पाठराखण करत तावडे अतिशय सुसंस्कारी नेते आहेत आणि त्यांना लक्ष्मणरेषा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे ते कधीही असं करणार नसल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
तावडे यांच्या सारखा संस्कारी नेता असे कधीच करणार नाही
ठाकूर बंधूंकडून काय दडपशाही होते आहे हे सर्वांनाच माहित आहे. तावडे यांच्या सारखा संस्कारी नेता कधीच असं काम करू शकत नाही, तरी तर तुमच्या कडे काही पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला पुरावे द्या, कोर्टात दाद मागा, पण अशा प्रकारे घेरायचं, मारायची धमकी द्यायची, हे योग्य नाही. तावडे अतिशय सुसंस्कारी नेते आहेत आणि त्यांना लक्ष्मणरेषा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे ते कधीही असं करणार नाही. असा विश्वास दर्शवत सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न अतिशय गंभीर- सुधीर मुनगंटीवार
मी निवडणुकीत अतिशय संतुलित प्रचार केला, मी माझी केलेली विकास कामे लोकांपुढे मांडली. काल प्रचार संपला मात्र मी प्रचारदरम्यान कोसंबी गावात पोहोचू शकलो नव्हतो, म्हणून मी कोसंबी गावातल्या कार्यकर्त्यांना सहज भेटण्यासाठी गेलो होतो. तिथे कुठल्याही प्रकारचा प्रचार सुरू नव्हता, मात्र काँग्रेसचे उमेदवार तिथे काही गुंडांना घेऊन आले. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला जर काही तक्रार असेल तर निवडणूक आयोगाकडे जा, कायद्याच्या चौकटीत राहून तक्रार करा, मात्र त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यामुळे गावकरी आणि कार्यकर्ते चिडले, पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. मात्र मला धक्काबुक्की करण्याचा झालेला प्रयत्न अतिशय गंभीर बाब आहे
काय संवाद झाला, मला माहिती नाही. मी बाजूला होतो, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.