विरार:- भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे.
त्यातच आता नालासोपारामध्ये पैसे वाटपावरून मोठा गदारोळ माजला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. तसेच विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये चौकशीसाठी घेतल्याचे दिसले. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर, त्यांनी तावडेंना कोंडून ठेवले. यावर भाजप काय खुलासा करणार आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
विनोद तावडेंकडे १५ कोटींपेक्षा जास्त रक्कम होती असं ऐकलं. त्यातील ५ कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितिज हाकून यांच्या ताब्यात आहेत. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सत्ताधारी पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यावर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे बोलणार आहेत. माझ्याकडे तीच माहिती आहे. तावडेंनी माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे भविष्यात आपल्याला जाड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. राष्ट्रीय महासचिव आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना पकडून देण्यासाठीच भाजपमध्येच कारस्थान झालं.