रत्नागिरी : शहरानजीकच्या जांभुळ फाटा ते पाटीलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कालिकामाता मंदिर येथील पुलाच्या निर्जन ठिकाणी तसेच खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली व आठवडा बाजार येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्री व मद्यसेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील सदाशिव जाधव (50), बिपीन महादेव शेटये (42), विश्वनाथ नथुराम मोरे (38) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत जांभुळ फाटा येथे एकाकडून विनापरवाना 2 हजार 25 रुपयांची दारु जप्त केली. खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली 820 रुपयाची विदेशी दारु सापडली तर तिसरा संशयित मद्यप्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव, संतीश राजरत्न व पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.