भाजप शहराध्यक्ष राजन फाळके यांचे स्पष्टीकरण
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी असल्याचा गैरसमज पसरवला जात आह़े. प्रत्यक्षात आमचे बुथप्रमुख, बुध अध्यक्ष सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने महायुतीचे काम करत आहेत. कुणीही नाराज नाही, असे स्पष्टीकरण भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके यांनी केल़े.
भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सोमवारी सर्वत्र ऐकावयास मिळत होत़ी. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शहरातील हॉटेल विवेक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े. यावेळी जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी, सचिन करमरकर आदी उपस्थित होते.