मेष : आज आर्थिक लाभाच्या चांगल्या शक्यता आहेत
मेष : आज आर्थिक लाभाच्या चांगल्या शक्यता आहेत. विद्यार्थीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. बेकायदेशीर कामात असलेल्या लोकांपासून दूर रहा; अन्यथा तुमचे नुकसान होईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आज कामात विशेष यश मिळणार नाही, पण कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वाद दूर होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यासाठी हा काळ लाभदायक असेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल
वृषभ : आज तुम्ही एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडावेळ व्यतित केल्याने मनःशांती लाभेल. राजकीय कार्यापासून दूर राहा. अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. विद्यार्थी आणि तरुणांनी करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिस्पर्ध्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबासोबत थोडा वेळ व्यतित केल्याने तणाव दूर होईल. ॲलर्जी आणि उष्णतेशी संबंधित विकार जाणवू शकतात.
मिथुन : ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो
मिथुन : आजचा दिनक्रम खूप व्यस्त असेल.आज तणावपूर्ण परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवणे चांगले. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. एखाद्या अप्रिय घटनेची बातमी मिळाल्याने नैराश्य आणि भीती निर्माण होऊ शकते. मशीन फॅक्टरी इत्यादींशी संबंधित व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील.
कर्क : अनोळखी व्यक्तीची भेट तुम्हाला नवीन दिशा देईल
कर्क : अनोळखी व्यक्तीची भेट तुम्हाला नवीन दिशा देईल. धार्मिक व सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. कर्ज घेण्यापूर्वी ते फेडायचे कसे याबाबत नियोजन करा. मुलाच्या करिअरशी संबंधित योग्य मार्गदर्शन करुन त्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुमची मदत आवश्यक असेल. नवीन जनसंपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अतिरिक्त कामामुळे कुटुंबासाठी वेळ देतात येणार नाही. आरोग्य चांगले राहील.
सिंह : चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
सिंह : ग्रहमान अनुकूल आहे. आज सकारात्मक बातमी मिळाल्याने आत्मविश्वास उंचावेल. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा. अति अतिआत्मविश्वासामुळे तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. संवाद साधताना योग्य शब्द वापरा. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक समन्वय योग्य राहिल.
कन्या : वैवाहिक जीवनाबाबत चिंता राहील
कन्या : जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जनसंपर्क मजबूत करा. धार्मिक स्थळाला भेट द्याल. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक जीवनाबाबत चिंता राहील. तुमचा हस्तक्षेप आणि सल्ला त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करेल. व्यापार बदलाच्या योजनांवर चर्चा होईल. गैरसमजामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. दिवसभरातील धावपळीमुळे मानसिक व शारीरिक थकवा जाणवेल.
तूळ : अतिकामामुळे चिडचिड होईल
तूळ : आज तुमची योग्य कृती तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवून देईल. आर्थिक गुंतवणूक करताना भविष्यातील विचार करुनच निर्णय घ्या. भावांसोबतचे नाते बिघडणार नाही, याची काळजी घ्या. अतिकामामुळे चिडचिड होईल. पती-पत्नीने कुटुंबातील कोणतीही समस्या चर्चेतून सोडवावी. आरोग्य चांगले राहिल.
वृश्चिक : सकारात्मक विचाराने नियोजित कामे पार पाडाल
वृश्चिक : आज तुम्ही सकारात्मक विचाराने नियोजित कामे पार पाडाल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक आणि राजकीय कार्यात वेळ वाया घालवू नका. चुकीच्या व्यक्तीकडून तुमचा अपमान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे सामान्य होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
धनु : वैवाहिक जीवन आनंदी राहील
धनु : स्थलांतरासंदर्भात विचार करण्याची योग्य वेळ आहे. तुमचे एकमेकांशी संतुलित व्यवहार चांगले समन्वय घडवून आणतील. एखाद्याचे गैरसमज रागावण्याऐवजी समजुतीने दूर करण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रकृती चांगली राहिल.
मकर : व्यवसायात सकारात्मक स्थिती राहील
मकर : आज भावनिकतेऐवजी चातुर्याने आणि विवेकाने केलेल्या कृतीतून कोणतीही समस्या योग्य प्रकारे सोडवू शकाल. धार्मिक नियोजनात सहभागी व्हाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. अति तणावाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो. व्यवसायात सकारात्मक स्थिती राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण असू शकते. सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात.
कुंभ : पूर्ण विचाराअंतीच कर्ज घेण्याचा विचार करा
कुंभ : आज आर्थिक बाबींवर पूर्ण आत्मविश्वासाने काम करा. कोणत्याही नकारात्मक गोष्टी सोडण्याचा संकल्प करा. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. पूर्ण विचाराअंतीच कर्ज घेण्याचा विचार करा. प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध मजबूत करण्यावर भर द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी असेल.
मीन : आर्थिक योजना प्रत्यक्षात आणण्याची वेळ
मीन : आज कोणत्याही जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित काम पूर्ण होऊ शकते. तुमच्या आर्थिक योजना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे. सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान असेल. जवळच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या हालचालींबद्दल अनभिज्ञ राहू नका. विद्यार्थी वर्ग त्यांच्या ध्येयाकडे अधिक लक्ष देईल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.