रत्नागिरी:-शहरानजीकच्या कुवारबाव येथील आरटीओजवळच्या रेल्वे पुलावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल़ी. तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले होते. त्याचे शीर धडापासून वेगळे झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी पोलिसाकडून पंचनामा करण्यात आल़ा. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला. मृत आवस्थेत आढळलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आह़े. दरम्यान संबंधित मृताविषयी अधिक तपास करण्यात येत असल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.