प्रशिक्षणात राज्यातील तिघांचा समावेश
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी च्या रा.भा. शिर्के प्रशालेचे स्काऊट विभाग प्रमुख यांची राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी तर्फे एअर स्काऊट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड व राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र , पंचमढी व भारत स्काऊट गाईड यांच्या तर्फे सदर राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील तिघांची निवड करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणात स्काऊट मूलभूत प्रशिक्षणासह हवाई उड्डाणाचा इतिहास , हवाई प्रवास साधनांची तांत्रिक माहिती ,नियम , इंडीयन एअर फोर्स इतिहास व कामगिरी यांसह हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना क्षेत्रभेट , आपत्कालीन परिस्थिती प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे.
प्रशांत जाधव यांनी जयपूर राजस्थान येथील राष्ट्रीय जांबोरीत सहभाग नोंदविला त्यानंतर हिमालय वुड बॅज हे राष्ट्रीय स्तरावरील ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे . मागील वर्षी त्यांनी १३ विद्यार्थ्यांना राज्यपाल पुरस्कार साठी बसविले त्यापैकी ११ जणांना लवकरच राज्यपुरस्कार प्रमाणपत्र मिळणार आहे असे समजते. श्री पी.सी. जाधव यांच्या निवडी बद्दल मुख्याध्यापक श्री .के डी.कांबळे , शालेय समिती अध्यक्ष विजय साखळकर यांनी रत्नागिरी शिक्षण संस्थेतर्फे तसेच जिल्हा स्काऊट संघटक रमाकांत डिंगणे यांनी प्रशिक्षणासाठी सदिच्छा दिल्या असून निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.