मेष : आज तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर उपाय शोधाल
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर उपाय शोधाल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाबाबत गंभीर असतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या समस्यांवर खर्च होईरू. मुलांना हव्या त्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आणि विषयांची निवड करण्यात अडचणी येऊ शकतात. आज कठोर परिश्रमास योग्य फळ मिळणार नाही. घरामध्ये त्रासामुळे थोडा तणाव राहील. वातावरण बदलाचा कुटुंबावर विपरीत परिणाम होईल.
वृषभ : आज तुमच्या कार्यशैलीत नावीन्य येईल
वृषभ : आज तुमच्या कार्यशैलीत नावीन्य येईल. तरुणांना मुलाखतींमध्ये यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे परस्पर संमतीने निकाली काढता येतील. कोणत्याही प्रकारचा संवाद साधताना काळजी घ्या. अतिचर्चा टाळा, अशी सूचना श्रीगणेश करतात. प्रवासात काही अडचणी येवू शकतात. व्यवसायात लाभदायक स्थिती राहिल. घरातील सदस्यांमध्ये काही मतभेद होऊ शकतात. जुन्या आरोग्याच्या समस्येबद्दल चिंता राहील.
मिथुन : आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असेल
मिथुन : आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असेल. मनाप्रमाणे कामांमध्ये वेळ घालवल्यास मानसिक आनंद आणि समाधान मिळेल. अचानक मोठा खर्च समोर आल्याने मन अस्वस्थ राहील. सासरच्यांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. फसवणूक करणार्यांपासून सावध राहा. व्यवसाय व्यवस्थित चालू राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील.
कर्क : आज तुम्ही कार्याप्रती समर्पित राहिल्यास यश मिळेल
कर्क : आज तुम्ही कार्याप्रती समर्पित राहिल्यास यश मिळेल. गुंतवणुकीचे निर्णयही योग्य ठरतील. तरुणांना मुलाखतीमध्ये यश लाभेल. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वासू ठेवू नका. वाईट सवयी आणि वाईट संगतीपासून दूर राहा. जमीन, मालमत्तेचे प्रकरण पूर्ण करण्यात अडचणी येतील. अर्थाशिवाय कोणाशीही वाद घालू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. साहित्य आणि कला संबंधित व्यवसायात चांगले यश मिळेल. पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद वेळीच मिटतील. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका.
सिंह : पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज पैशासंबंधित प्रश्नांवर शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घ्या. तुमच्यातील इच्छाशक्ती तुम्हाला अनुभवता येईल. घराच्या डागडुजीत अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. घर-कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढतील. मुलांबाबत एक प्रकारची चिंता संतावू शकते. पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका.
कन्या : आज तुम्ही मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ व्यतित कराल
कन्या : आज तुम्ही मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ व्यतित कराल. तुमची जीवनशैलीही बदलाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व कायम राहिल. नवीन लोकांशी झालेला संपर्क लाभदायक ठरेल. दुपारनंतर कोणाशी वाद होऊ शकतात, याची जाणीव ठेवा, असे संकेत श्रीगणेश देतात. तुम्हाला काही चुकीचे निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायातील अडथळे दूर होतील. नवीन जबाबदाऱ्याही तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकाल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : चुकीच्या कृतीमुळेही काही वेळ वाया जाऊ शकतो
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही सर्व समस्यांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यास सक्षम असाल. घरात नवीन वस्तू खरेदी करणे देखील शक्य आहे. चुकीच्या कृतीमुळेही काही वेळ वाया जाऊ शकतो. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा वाद उद्भवतील. व्यवसायात काही ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : आज महिलांसाठी दिवस अनुकूल आहे
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज महिलांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रवास टाळा. आळस आणि निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत योग्य होणार नाही, याची जाणीव ठेवा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात फायदा होणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आरोग्यासंबंधी समस्या जाणवतील.
धनु : आज ग्रहमान अनुकूल आहे
धनु : आज ग्रहमान अनुकूल आहे. मनःशांती कायम राहील. संयम आणि सहनशक्तीने ध्येय साकाराल. प्रत्येक कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नीट चर्चा करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न वाढीबरोबर खर्चही वाढतील. मालमत्ता खरेदी-विक्रीत तुमची फसवणूक होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल.
मकर : घरगुती आणि व्यावहारिक जीवनात सकारात्मक बदल घडतील
मकर : आज घरगुती आणि व्यावहारिक जीवनात सकारात्मक बदल घडतील. मालमत्तेशी संबंधित कामेही सुरू होतील. मागील काही अनुभवांतून शिकून योग्य निर्णय घेण्याचाही प्रयत्न कराल. जुन्या मित्राचीही भेट होऊ शकते. मौल्यवान साहित्याची काळजी घ्या. न्यायालयीन प्रकरणे टाळण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायात लवचिकता राहील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्ही उत्साही व्हाल.
कुंभ : भावनांच्या आहारी वाहून जाऊ नका
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, एखादी चांगली बातमी मिळेल ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आपल्या कलागुणांना वाव देऊन समाजात आणि कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करा. विशेषत: महिला त्यांच्या घरातील आणि वैयक्तिक व्यवहारात योग्य समन्वय राखतील. आज कोणत्याही कामात भावनांच्या आहारी वाहून जाऊ नका. व्यावहारिक दृष्टिकोन बाळगा. कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो. आवश्यक वाद घालणे टाळा. सांघिक कार्यातून व्यवसायात यश मिळवू शकाल. कुटुंबासोबत खूप आनंदी वेळ जाईल. जुन्या आरोग्य समस्या पुन्हा उद्भवणे निराशाजनक असू शकते.
मीन : आज रखडलेल्या कामांना गती मिळेल
मीन : आज रखडलेल्या कामांना गती मिळेल. मुलांशी संबंधित कोणतेही चांगले कार्य देखील सुरू केले जाऊ शकते. संयमाने कामे करण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यातही योग्य वेळ जाईल. ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या. वाहनाची देखभाल आणि सर्व्हिस करण्यावर भर द्या. सरकारी कामात यश मिळेल. वाहने काळजीपूर्वक वाहन चालवा.