देवरुख:-सह्याद्रीच्या कडेकपारित मारळ नगरीत वसलेल्या, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्री प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी त्रिपुरारी पोर्णिमेला दीपोत्सव मनाकऱयांच्या उपस्थितीत पार पडला. शेकडो दिव्यांनी संपूर्ण मंदीर परिसर उजळून गेला.
या उत्सवाची सुरुवात देवस्थानचे पुजारी व जंगम यांच्याकडून विधीवत पुजाअर्चा करुन केली जाते. पुजायांनी श्री देव मार्लेश्वराचे 360 मनाकयांना साद घालून आमंत्रण दिले जाते. मंदिर परिसरात दिवे लावण्यात येतात. आरती झाल्यानंतर श्री क्षेञ मार्लेश्वर येथे तुळसी विवाह पार पडतो. मंगलअष्टकानी सह्याद्री नागरी दुमदुमते.
डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा शुक्रवारी रात्री 8.30 वाजता देवस्थान समिती पुजारी, जंगम, मारळ-निवधे गावचे ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे भाविकांना शंकराच्या भुजंगाचे दर्शन ऊत्सवस्थळी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.