रत्नागिरी :हिवताप अधिकारी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी रमेश सीताराम मोने (वय ७७) यांचे पुणे येथे निधन झाले.
मोने यांनी रत्नागिरी, संगमेश्वर येथील हिवताप अधिकारी कार्यालयात प्रदीर्घ काळ नोकरी केली.
ते मूळचे कोतवडे गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त सुरवातीला ते रत्नागिरीतील घाणेकर आळी आणि नंतर कुवारबाव येथे स्थायिक झाले. आजारपणामुळे काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते. प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे तसेच भाऊ-बहिणी असा मोठा परिवार आहे.