रत्नागिरी : तालुक्यातील उमरे धनगरवाडी येथे स्वानंद फार्म हाऊस फोडून चोरट्याने घरगुती वापराचे व बागकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाची लूट करत फार्म हाऊस साफ केले. सुमारे २२ ते २५ हजाराचे साहित्य चोरट्याने लांबवले असून, ग्रामीण पोलिसात या बाबतीच तक्रार दाखल केली आहे.
प्रसन्न सदानंद मयेकर (रा. रत्नागिरी) यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उमरे धनगरवाडी येथे मयेकर यांचे स्वानंद फार्म हाऊस आहे. १४ ते १५ तारखेच्या दरम्यान चोरट्याने फार्म हाऊसचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. अज्ञातांनी संपूर्ण फार्म हाऊसच साफ करून टाकले.
बारीकसारीक सर्व वस्तू चोरून नेल्या. यामध्ये ६ हजार किमतीचा पांढऱ्या रंगाचा पोर्टेबल फ्रिज, हजार रुपये किमतीची स्टीलची गॅस शेगडी रेग्युलेटरसह, हजार रुपये किंमतीचा अर्धवट भरलेला गॅस सिलिंडर, बागकामाचे साहित्य कुदळ, फावडे, घमेले, खुरप्या, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, ड्रील मशीन असे हजारोंचे सामान चोरले. ९ हजारांचे दुसऱ्या स्लॅबचे सामान, १२ किमतीचे दोन फोमचे बेड व ९ उशा, वॉल लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा असे एकूण २२ हजारांचे सामान अज्ञाने लांबवले आहे. दुसऱ्या दिवशी मयेकर हे फार्म हाऊसवर गेल्यानंतर त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि धक्काच बसला. त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला.