खेड : तालुक्यातील चिंचघर प्रभूवाडी येथील अनिल जयराम कदम (५५) यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील १ लाख रोख रकमेसह १ लाख ५३ हजारांचे सोन्याचे दागिने असे एकूण २ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही चोरी दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या मुदतीत घडली आहे.
या चोरीची फिर्याद अनिल जयराम कदम यांनी येथील पोलिस स्थानकात दिली आहे. याप्रकरणी दि. १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. घरातील १ लाख रोख रकमेसह २० हजार रुपये किमतीचा सोन्याचा कुड्याचा एक जोड, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, दोन सोन्याची पाने, कुड्याचा एक जोड व एक सोन्याची अंगठी असे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून २ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून केला – आहे. अधिक तपास येथील पोलिस करीत आहेत.