फाइव स्टार एमआयडीसी विकासाचा गाव विकास समितीचा संकल्प
देवरुख:- ग्रामीण भागाचा विकास करण्याची आम्हाला एक संधी द्या.नोकरी साठी मुंबई,कोल्हापूर, सांगली, पुण्यात होणारे स्थलांतर आम्ही थांबवू. फाईव्ह स्टार एमआयडीसी विकासाच्या संकल्पातून संगमेश्वर चिपळूण मध्ये 20 हजाराहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू.रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे.शिट्टी चिन्हा समोरील बटन दाबून जनतेने आम्हाला ताकद द्यावी असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मतदारांना केले आहे.
गाव विकास समितीने ओस पडणारी गावे, गावातून होणारे रोजगारासाठीचे स्थलांतर आणि शिक्षण घेऊनही तरुणांना नसणाऱ्या नोकऱ्या हा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच तापवला आहे.गाव विकास समितीच्या एमआयडीसी विकास या मुद्द्याने प्रस्थापितांना देखील घाम फोडला आहे. एकीकडे गाव विकास समितीने तालुका निहाय एमआयडीसी विकासाची गॅरंटी आपल्या करारनाम्यातून दिली असतानाच आता चिपळूण संगमेश्वर तालुक्यात गाव विकास समितीचा उमेदवार विजयी झाल्यास फाईव्ह स्टार एमआयडीसी विकासाचा संकल्प करून त्या माध्यमातून सुमारे 20000 हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार गाव विकास समितीच्या माध्यमातून केला असल्याचे संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सांगितले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे असून गाव विकास समितीचा उमेदवार शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून जनतेने विजयी करावा, आम्हाला ताकद द्यावी असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे. फाईव्ह स्टार एमआयडीसीचा विकास चिपळूण संगमेश्वर तालुक्यात करण्याचा निर्धार गाव विकास समितीने केला असून या माध्यमातून संघटनेचा उमेदवार विजयी झाल्यास येथील स्थानिक भूमिपुत्रांना सुमारे वीस हजारहून अधिक रोजगारच्या संधी उपलब्ध होतील असे धोरण आखले जाईल. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील. संगमेश्वर चिपळूण भागात औद्योगिक धोरण राबवण्यात नागरिकांचा सहभाग घेतला जाईल. उद्योगांना विरोध होणार नाही अशा पद्धतीचे वातावरण चिपळूण संगमेश्वर मध्ये निर्माण केल जाईल असेही सुहास खंडागळे यांनी सांगितले .
अनघा कांगणे यांना शिट्टी चिन्हा समोर बटन दाबून चिपळूण संगमेश्वर मधील तरुणवर्गाने,त्यांच्या आई-वडिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे व या नव्या बदलाचे साक्षीदार व्हावे असेही सुहास खंडागळे म्हणाले.