रत्नागिरी : साळवीस्टॉप येथे ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वा. उघडकीस आली. महंम्मद शफिक हौसिलदार खान (70, मुळ रा.सम्राट अशोक नगर चेंबुर,मुंबई सध्या रा.साळवी कन्स्ट्रक्शन ऑफीस,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
महंम्मद खान हे खबर देणार यांच्या साळवी कन्स्ट्रक्शन ऑफीसच्या गाडीवर गेले 7 वर्षे ड्रायव्हर म्हणून कामाला होते. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या ऑफीसमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला आले होते. ते रात्रीच्या वेळी ऑफीसमध्ये किंवा ट्रकमध्ये झोपायचे. त्याप्रमाणे बुधवार 13 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री 11 वा. ते ट्रक (एमएच-08-एपी-2277) मध्ये साळवीस्टॉप येथील वेलकम हॉटेल समोर झापले होते.
गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वा. पासून खबर देणार हे महंम्मद खान यांना फोन करत होते. परंतू ते फोन उचलत नसल्याने खबर देणार त्यांच्या ऑफीस स्टाफसह ट्रक उभ्या असलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना खान हे झापलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांना उठवण्याचा प्रयत्न करण्यात केला असता ते शुध्दीत येत नसल्याने त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.