जमीर खलफे / रत्नागिरी
शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेच्या स्काऊट गाईड विभागाच्या काही विद्यार्थ्यांची विधानसभा निवडणूकीत स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा.शिर्के चे विद्यार्थी नेहमीच विविध नाविन्य पूर्ण उपक्रमात सहभागी होवून चमकदार कामगिरी करीत असतात. यावेळी विधानसभा निवडणूक २०२४ साठी प्रशालेच्या ५ विद्यार्थ्यांची शहरातील विविध शाळांमध्ये स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावरील पुरुष – महिला मतदार, गरजू वयस्कर मतदार , दिव्यांग मतदार यांच्या रांगांचे व्यवस्थापन करणे , आवश्यकता भासल्यास व्हीलचेअरचा उपयोग करून मतदारांना केंद्राच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहोचविणे अशा स्वरूपाचे स्वयंसेवी कार्य करण्याचे योगदान स्काऊट करणार आहेत. यामध्ये स्का.तनिष तुषार सावंत (सी स्काऊट कॅप्टन ), स्का सार्थक सुनील काळे ( एअर स्काऊट लीडर ) निशांत शिवप्रसाद लिंगायत (स्काऊट संघ प्रमुख)
भावेश हनमंत पाटील , वेदांत अनिल भिंगारे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे, स्काऊट गाईड विभाग प्रमुख प्रशांत जाधव जिल्हा संघटक रमाकांत डिंगणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शालेय समिती अध्यक्ष ॲड विजय साखळकर यांनी सहभागी स्काउटसचे संस्थे तर्फे कौतुक केले आहे.