खेड : तालुक्यातील चिंचघर-प्रभुवाडी येथे चोरट्याने घरफोडी करून 20 हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केल्याची तक्रार अनिल जयराम कदम यांनी येथील पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
9 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप धारदार हत्याराने तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटातील 20 हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.