लांजा : तालुक्यातील साटवली मार्गांवरील कोत्रेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी वीज झाडावर कोसळून झाडाच्या ठिकऱ्या उडाल्याचे दिसून आले. या प्रकाराने ग्रंथांमध्ये भीतीने थरकाप उडाला. झाडाच्या ठिकऱ्या पाहून जीवात धस्स झाले. मात्र सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. दरम्यान येथील रमेश परशुराम कोत्रे यांच्या घरातील टी.व्ही. संच तसेच इन्व्हर्टर व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
रमेश कोत्रे यांच्या घरापासून १०० फुट अंतरावर असलेल्या झाडावर शुक्रवार 15 रोजी सायंकाळी 6.30 वाजता वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसात वीज झाडावर कोसळली. यावेळी झाडाचे तुकडे तुकडे झाले. झाडाची अवस्था पाहिल्यानंतर धरकाप उडतो अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली.