चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे गुरुवारी एका वाहन चालकावर कारवाई करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली.
सुनील पांडुरंग झगडे (55, कळंबस्ते) असे कारवाई झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याबाबतची तक्रार गणेश नाळे (चिपळूण पोलिस ठाणे) यांनी दिली आहे. सुनील झगडे यांनी शहरातील बहादूरशेख नाका थांबा येथे गुहागर-विजापूर मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनास अडथळा तसेच पादचाऱ्यास धोका होईल अशी स्वरुपातील वाहने उभी करुन ते कोठेतरी निघून गेले होते. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.