रत्नागिरी : तालुक्यातील आजगे येथे झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तरुण अत्यवस्थ झाल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी दिगंबर दत्ताराम मांडवकर (35, ऱा आजगे त़ा लांजा) असे तरुणाचे नाव आह़े. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़.
दिगंबर हा वेल्डिंग कामगार म्हणून कामाला असून तो मागील काही दिवसांपासून आजारी होत़ा. 14 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दिगंबर याने झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल़े. यावेळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केल़े अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आह़े. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.