रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव रवींद्रनगर येथे युवकाने गळफास घेत आत्महत्या केल़ी. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल़ी. कौशल किसन लाळीकर (22, ऱा रवींद्रनगर, कुवारबाव) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े.
कौशल हा 15 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण करुन आपल्या खोलीत गेला होत़ा. यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घराच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आल़ा. कौशल याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाह़ी. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आह़े.